कवी संमेलनात सामाजिक प्रबोधनाच्या कवितांचा मुक्त उधाण

कवी संमेलनात सामाजिक प्रबोधनाच्या कवितांचा मुक्त उधाण

कल्याण

 

      कवी शाम बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली कवी कट्टा कल्याण मुंबईने आयोजित केलेले सामाजिक प्रबोधनाचे कवी संमेलन गुलमोहर कॉलनी, विजयनगर कल्याण पूर्व येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला कवी अशोक भवार, कवी कट्टा कल्याण मुंबईचे अध्यक्ष नवनाथ रणखांबे आणि सार्थक साहित्य प्रकाशनच्या प्रकाशिका प्रा. आशा रणखांबे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमात विविध सामाजिक मुद्द्यांवर आधारित कविता सादर करण्यात आल्या. कवी संमेलनात कवितेच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी शाम बैसाणे यांनी कवितेचे महत्त्व आणि समाजातील त्याची भूमिका यावर प्रकाश टाकला.