वेंगुर्लेत मोफत मधुमेह योग शिबिराचे आयोजन; २९ ऑक्टोबरपासून सुरुवात

वेंगुर्लेत मोफत मधुमेह योग शिबिराचे आयोजन; २९ ऑक्टोबरपासून सुरुवात

वेंगुर्ला

    वेंगुर्ला नगरपरिषद व डॉ. वसुधाज योगा अँड फिटनेस अकॅडमी, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मधुमेह योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराच्या तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. वसुधा ना. मोरे (M.Sc. Yoga Therapy) या असून त्यांना योगा थेरपी व मधुमेह नियंत्रण मार्गदर्शनाचा मोठा अनुभव आहे.

शिबिराची वैशिष्ट्ये
शिबिरापूर्वी सहभागींसाठी Fasting Insulin, Fasting & P.P. Sugar, HbA1C या रक्त चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.या 7 दिवसीय शिबिरात रक्तातील साखर नियंत्रण, योग्य आहार, योगासने व व्यायाम, ध्यान व प्राणायाम, वजन नियंत्रण, औषध सेवन, गुंतागुंतीची काळजी, तणाव व्यवस्थापन आणि जीवनशैलीत बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

कालावधी : 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर (7 दिवस)
स्थळ : वेंगुर्ला नगरपरिषद सभागृह
वेळ : सायंकाळी 4 ते 6

 या उपक्रमात जेष्ठ नागरिक संस्था, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व लिनेस क्लब वेंगुर्ला या संस्था सहभागी आहेत.शिबिरात सहभाग मर्यादित असून नोंदणी सुरू झाली आहे.
संपर्क : 07774876395, 9130048102