श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वेंगुर्ल्यात दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जागवणारी आणि हिंदू समाजात राष्ट्रभक्ती व धर्मजागृतीची प्रेरणा देणारी श्री दुर्गामाता दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेंगुर्ला विभाग आणि गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात वेंगुर्ला शहरात सुरू आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत होत असलेल्या या दौडीची नववी माळ सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, माणिक चौक) येथे संपन्न झाली. शिवतीर्थ येथे प्रतिमापूजन, शस्त्रपूजन आणि प्रेरणामंत्र पठण करून ही दौड शिवतीर्थ (माणिक चौक) - कॅम्प कॉर्नर दुर्गामाता मंदिर आणि परत शिवतीर्थ अशा मार्गाने संपन्न झाली. यामध्ये प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुरेंद्र चव्हाण, प्रज्वल कोंयंडे, संदीप कोयंडे, शरद मेस्त्री, सत्यवान परब, अमोल आरोसकर, मंजुषा आरोलकर, रसिका मठकर, कृपा गिरप- मोंडकर, अमित राऊत, आशिष पाडगावकर, संजय तेरेखोलकर, गिरीश गोगटे, रवींद्र शिरसाठ, महादेव मेस्त्री आदीसह हिंदू धर्माभिमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
konkansamwad 
