सावंतवाडी-मुंबई एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; १५ डिसेंबरपासून नवे वेळापत्रक लागू
सावंतवाडी
कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सावंतवाडी रोड-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसच्या (15088) वेळेत मध्य रेल्वेने बदल केला आहे. हे सुधारित वेळापत्रक 15 डिसेंबर 2026 पासून लागू होणार आहे.नव्या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड स्थानकातून सायंकाळी 5.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.00 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, दादर आणि ठाणे.प्रवाशांनी सुधारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा KR Mirror App वर माहिती पाहावी.
konkansamwad 
