पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली; दोघा खलाशांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि मत्स्य विभागाला यश.
रत्नागिरी.
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका गुरुवारी सायंकाळी उशिरा बुडाली. अद्याप समुद्र खवळलेला असल्याने अशा खराब वातावरणामुळे नौकेत पाणी भरल्याने ही दुर्घटना घडली. नौकेवरील दोन खलाशांना मत्स्य विभागाने कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले.
नारळी पौर्णिमा झाली असली तरी समुद्रातील वातावरण पोषक नाही समुद्र खवळलेला आहे. रत्नागिरी जवळ पूर्णगड जवळ खवळलेल्या समुद्रात एका बोटीत दोन खलाशी अडकल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोस्टगार्डला माहिती मिळाली तात्काळ कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने दोघांचेही सुखरूप बचावकार्य केले अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. रत्नागिरी येथून सेकंडहॅन्ड बोट खरेदी करून दोन्ही खलाशी कर्नाटकच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आपत्कालीन प्रसंग त्यांच्यावरती ओढवला होता. मात्र कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले आहेत.
पूर्णगड समुद्रात काही अंतरावर ही नौका मासेमारी करत होती. यावेळी समुद्रातील वातावरण खराब झाल्याने बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. बोटीत पाणी भरण्यास सुरुवात होताच बोटितील खलाशांनी तात्काळ बोटीवर चढून मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर लगेचच मदतीसाठी मत्स्य विभागाशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. यानंतर लगेच कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर येथे दाखल झाले आणि नौकेवरील दोघा खलाश्यांना रेस्क्यू करुन बाहेर काढण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत कोस्टगार्ड आणि मत्स्य विभागाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.