आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त शंकर घोगळे यांचा परुळे ग्रामपंचायतीतर्फे सत्कार.

दै. प्रहार व कोकण संवादचे परुळे प्रतिनिधी शंकर घोगळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला असल्याने परुळे ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. शंकर घोगळे यांना सन 2025 चा अरुण काणेकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. याचे औचित्य साधून त्याचबरोबर ग्रामपंचायत येथे लिपिक पदावर कार्यरत असूनही गेली 15 वर्षे पत्रकार म्हणुन हिरीरीने काम करत आहेत. याचीच पोचपावती म्हणून प्राप्त झालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रामसेवक शरद शिंदे ,तलाठी गवते, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, पूनम परुळेकर, नमिता परुळेकर, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, सीमा सावंत सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. काजल परब, मुख्याध्यापक प्रविणा दाभोलकर, आरोग्य सेवक एस. आर. चव्हाण, शिक्षक वर्ग, कोतवाल स्वप्निल वरक, पशुवैद्यकीयचे अजित चव्हाण, आप्पा राठीवडेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.