मतदान केंद्र असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी.

सिंधुदुर्ग.
महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकीसाठी बुधवार दि. 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीकरीता ज्या शाळा, महाविद्यालयामध्ये मतदान केंद्र आहेत, त्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली जाईल याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (योजना) यांनी केले आहे.