विकास संस्था या प्रत्येक गावातल्या आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू : मनिष दळवी. १०० टक्के वसुली केलेल्या ११ संस्थांचा करण्यात आला गौरव.
देवगड.
विकास संस्थानी काळाबरोबर बदललं पाहीजे आणि हा काळ आता सुरू झालाय.केंद्र सरकारने विकास संस्थाना अनन्य साधारण महत्व दिलेय. विकास संस्था या त्या त्या प्रत्येक गावातल्या आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू असल्याने विकास संस्थामध्ये होणारा बदल शेतक-यांसाठी महत्वाचा आहे. विकास संस्थांमध्ये बदल व्हावे तसेच आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे व्हावेत व राज्यस्तरावर विकास संस्थांची पत उंचावावी यासाठी विकास संस्था संगणकीकरण करण्याचा उपक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. जिल्हा बँकेने
गेली दोन वर्षे थेट २० हजार रुपये आर्थिक मदत विकास संस्थाना सुरू केली आहे. सहकारी संस्थां संस्थांच्या संगणीकरणामुळे राज्यस्तरावर देखील ग्रामीण भागातील संस्थांचे व्यवहार राज्यस्तरावर पाहता येतील व गावच्या गावातील संस्थेचा स्तर उंचावून एक गाव चांगल्या पद्धतीने उभे उभ राहू शकेल अशी पारदर्शकता संस्था संगणक करण्याच्या माध्यमातून होणार आहे यासाठी संस्था संगणीकरणांमध्ये सहकार्याची भावना सर्व संस्थांची सर्व संस्थांनी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जामसंडे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावतीने देवगड तालुक्यातील जामसंडे सांस्कृतिक भवन येथील सभागृहात प्राथमिक विकास सेवा सोसायटी संवाद कार्यक्रमादरम्यान ते व्यासपीठावरून बोलत होते यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, जिल्हा बॅकेचे संचालक प्रकाश बोडस , पुरळ-गिर्ये विकास संस्थेचे चेअरमन रविंद्र तिर्लोटकर,भाजपा जिल्हा सरचिटणीस संदिप साटम, संतोष किंजवडेकर, क्षेत्रवसुली उप सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे,कर्ज विभाग प्रमुख के बी वरक,संगणक प्रमुख हडकर, तालुका विकास अधिकारी, दिगंबर गवाणकर, संजय घाडी, संजय परब, जर्नादन ठुकरूल देवगड शाखा व्यवस्थापक अवधूत गोडवे, विकास संस्थांचे चेअरमन, सचिव सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दळवी पुढे म्हणाले प्रत्येक संस्थेचा व्यवसाय हा अधिक वाढला पाहिजे या तालुक्याला इतकी चांगली संधी आहे की आपण हेच कर्ज वितरण १०० कोटी पर्यंत नेऊ शकतो. या विकास संस्थांच्या माध्यमातून ज्या दिवशी शंभर कोटी कर्ज वितरण या एकट्या तालुक्यात होईल तेव्हा या विकास संस्थांचा नफा हा केवढा कोटी रुपयांमध्ये जाईल.त्यावेळी त्या सगळ्या संस्था सक्षम झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून आपण आता फक्त शेती कर्जावर अवलंबून राहू नका. ज्या ज्या प्रकारची कर्ज वितरण जिल्हा बँकेच्या माध्यमातून केली जात आहेत. त्या सगळ्या प्रकारची कर्ज वितरण विकास संस्थेच्या मार्गाने करतांना आम्ही जिल्हा बँक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला यावेळी दळवी यांनी सांगितले.
यावेळी ३० जून अखेरपर्यंत देवगड तालुक्यातील ११ संस्थांनी १०० टक्के कर्ज वसुली केली. याबद्दल त्या विकास संस्थांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये पडेल विकास संस्था, किंजवडे विकास संस्था, महाळुंगे विकास संस्था, नाडण विकास संस्था, कुणकेश्वर विकास संस्था, वेळगिवे विकास संस्था,श्री भगवती विकास संस्था मुणगे,मोंड विकास संस्था, पुरळ गिर्ये विकास संस्था, वाडा विकास संस्था, हडपिड विकास संस्था या विकास संस्थांचा समावेश आहे.
केंद्र शासनाने ग्रामीण भागातील संस्थांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे जिल्हा बँक खऱ्या अर्थाने आता कात टाकतेय. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची राज्यस्तरावर यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी केले.तर तालुक्यातील सर्व संस्थांची कामगिरी चांगल्या पद्धतीने आहे मात्र आज १००% वसुली करणाऱ्या केवळ ११ संस्था आहेत त्या २० होतील याची अपेक्षा व्यक्त करतो.सरकार कर्जमाफी करेल अशी भूमिका आता ठेवू नका.संस्थाची घेतलेली कर्ज वेळेत फेडा तसेच सहकारी संस्थांनीही कर्ज आणि खत या गोष्टींचा आता विचार न करता संस्था मोठ्या होण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय विकास संस्थांमध्ये सुरू करा. काळा बरोबर पुढे जायला पाहिजे यासाठीच संस्था संगणीकृत करण्याचे धोरण आहे. आज ज्या संस्था संगणीकृत नसतील तर त्या संस्था मागे जाणार त्यामुळे पर्यायी गावाचे नुकसान होणार यासाठी बदल हा अपेक्षित आहे. विकास संस्थांना कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही यासाठी तज्ञ संचालक आमदार नितेश राणे हे विशेष दक्षता घेत आहेत. असे मत जिल्हा बँकेचे संचालक अँड प्रकाश बोडस यांनी व्यक्त केले.