कुडाळ पंचायत समितीच्या सभापती पदी मिलिंद नाईक व उपसभापती पदी सिताराम तेली यांची बिनविरोध निवड

कुडाळ पंचायत समितीच्या सभापती पदी मिलिंद नाईक व उपसभापती पदी सिताराम तेली यांची बिनविरोध निवड

 


कुडाळ


     कुडाळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीमध्ये महायुतीचा झेंडा फडकला बिनविरोध झालेल्या या निवडीमध्ये सभापतीपदी मिलिंद नाईक तर उपसभापती पदी सिताराम तेली यांची निवड झाली ही निवड झाल्यानंतर सभापती दालनामध्ये खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांचे छायाचित्र लावण्यात आले आणि महायुतीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आले.कुडाळ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली होती 18 जागांपैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले होते या निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांची पहिली सभा आज सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कुडाळ नायक तहसीलदार अमरसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी 18 सदस्य उपस्थित होते ही सभा सभापती व उपसभापती निवडीसाठी घेण्यात आले महायुतीकडून सभापती पदासाठी मिलिंद नाईक व उपसभापतीसाठी सिताराम तेली यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. ही निवड बिनविरोध झाली आणि सभापतीपदी मिलिंद नाही व उपसभापतीपदी सिताराम तेली यांची निवड झाली. ही निवड झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना व भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य काका कुडाळकर, संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, दादा साईल, दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करालकर, सभापती अभय परब, सुनील भोगटे आदी उपस्थित होते.पंचायत समितीचा परिसर पुन्हा राणे यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. गेल्या दहा वर्षांपूर्वी कुडाळ पंचायत समितीमध्ये राणे विरोधी पक्षाची सत्ता होती पण पुन्हा एकदा राणेंची सत्ता या पंचायत समितीवर आली. सभापती व उपसभापती निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या सभापती दालनामध्ये पुन्हा खासदार नारायण राणे यांचे छायाचित्र दिमाखात लावण्यात आले तसेच आमदार निलेश राणे यांचेही छायाचित्र लावण्यात आले यावेळी खासदार नारायण राणे यांचा विजय असो महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार- सभापती मिलिंद नाईक यावेळी सभापती पदी निवड झालेले मिलिंद नाईक यांनी सांगितले की, सभापती पदासाठी महायुतीचे नेते खासदार नारायण राणे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही लोकाभिमुख प्रशासन राबवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. सर्व महायुतीच्या सदस्यांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत राहील असेही त्यांनी यावे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.