भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

कणकवली.

   भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महाविजय २०२४ अंतर्गत दि. १९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे भाजपा सुपर वॉरियर्स बैठक, बाजारपेठेत घर चलो अभियानांतर्गत जनसंपर्क, तर शहरात चौकसभाही होणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. तसेच गेली नऊ वर्षे निष्क्रिय ठरलेल्या खासदारांमुळे या मतदारसंघाची पिछेहाट झाली. त्यामुळे २०२४ ला या मतदारसंघाचा विकास करणारा, रोजगार निर्मीती व गावागावात विकासाच गंगा आणणारा महायुतीचा खासदार निवडून द्यायाचा आहे असेही श्री. राणे म्हणाले.येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवासेना जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, संतोष कानडे आदी उपस्थित होते.
   श्री. राणे म्हणाले, दि. १९ रोजी दु. ३ वा. चंद्रशेखर बावनकुळे हे खारेपाटण येथे येणार आहेत तेथे त्यांचे भव्य स्वागत होणार आहे. त्यानंतर ३.३० वा. भगवती मंगल कार्यालयात सुपर वॉरियर्स बैठक होणार आहे. ४.३० वा. ते भालचंद्र महाराजांचे दर्शन घेऊन ५ वा. शहरात ढालकाठी ते नवरात्रोत्सवापर्यंत घर चलो अभियानांतर्गत व्यापारी, जनता यांच्याशी संपर्क साधत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ६ वा. चौकसभा होणार असून सायंकाळी ७.१५ वा. ते सावंतवाडी विधानसभा संपर्क कार्यालयाचे सावंतवाडी येथे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते गोव्याकडे रवाना होणार आहेत.
    यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तिनही विधानसभांचे प्रमुख, तसेच प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास योजनेचे प्रमुख बाळा भेगडे, केशव उपाध्ये, संदीप लेले, महेश जाधव आदी मान्यवर असणार आहेत.