कणकवली पंचायत समिती सभापतीपदी हर्षदा वाळके तर उपसभापतीपदी सोनू सावंत
कणकवली
कणकवली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज पार पडली. यामध्ये सभापतीपदी हर्षदा वाळके यांची तर उपसभापतीपदी राजेश उर्फ सोनू सावंत यांची निवड करण्यात आली.पंचायत समिती सभागृहात झालेल्या या निवड प्रक्रियेत सदस्यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर हर्षदा वाळके यांची सभापती म्हणून तर राजेश उर्फ सोनू सावंत यांची उपसभापती म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्य, कार्यकर्ते आणि समर्थकांनी अभिनंदन केले. कणकवली तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

konkansamwad 
