सिंधुरत्न योजनेतुन ख़र्च करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करावी ; उबाठा गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

सिंधुरत्न योजनेतुन ख़र्च करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करावी ;    उबाठा गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

 

       सिंधुरत्न योजने अंतर्गत सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष ना. श्री. दिपक केसरकर यांनी वैयक्तिकरित्या अनेक ठिकाणी सिंधुरत्न योजनेचा निधी मनमानीपणे वापरला असा आरोप उबाठा गटाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला असून सिंधुरत्न योजनेतून दिलेल्या निधीची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे.
  त्यांनी या निवेदनात असे म्हटले की, सिंधुरत्न योजनेच्या निधी ज्या ज्या कामांसाठी खर्च झालेला आहे. त्या सर्व निधीच्या वापराची चौकशी करण्यात यावी. विशेषकरुन सिंधुरत्न योजनेच्या निधीतून करण्यात आलेली विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कामांची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच सिंधुरत्न योजनेच्या निधीचा वापर करताना मंजूर करण्यात आलेल्या कामांचे निकष तपासून पाहणे आवश्यक आहे. कारण काही निधी सर्वसामान्यांसाठी खर्च न होता, वैयक्तिक व व्यावसायिक लोकांसाठीच विद्युत ट्रान्सफॉर्मर मंजूर करुन व्यावसायिकांसोबतचे वैयक्तिक संबंध जपण्यासाठी सिंधुरत्न योजनेचा गैरवापर करण्यात आला असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी वरील प्रकरणी सखोल चौकशी करुन त्याबाबत योग्य ती माहिती आम्हांला कळविण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे उबाठा गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हाप्रमुख श्री बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख श्री रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख श्री यशवंत परब, माजी जिल्हाप्रमुख श्री रमेश गावकर इतर उपस्थित होते