मांडवी खाडी येथे वनविभागाच्या वतीने कांदळवन स्वच्छ्ता मोहीम.

मांडवी खाडी येथे वनविभागाच्या वतीने कांदळवन स्वच्छ्ता मोहीम.

वेंगुर्ला.

   वन्यजीव सप्ताह दिनानिमित्त मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ मठ, कांदळवन कक्ष मालवण, रोट्ररी क्लब वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान तुळस, कांदळवन समिती मांडवी, टांक यांचेमार्फत मांडवी येथे कांदळवन क्षेत्रामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी येथील परिसरातील कचरा गोळा केला.
  याप्रसंगी मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी कांदळवन संरक्षण व संवर्धनाबद्दल सविस्तर माहिती दिली.यावेळी वनविभाग अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.