वेंगुर्ला तालुक्यात १०४८ ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना सोडले नैसर्गिक अधिवासात.

वेंगुर्ला तालुक्यात १०४८ ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना सोडले नैसर्गिक अधिवासात.

वेंगुर्ला. 

  वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली-वायंगणी व उभादांडा समुद्रकिनारी १०४८ नवजात ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार व मठ वनपाल सावळा कांबळे तसेच स्थानिक कासव मित्र यांच्या उपस्थितीत पिल्लांना सोडण्यात आले. सध्या वेंगुर्ला तालुक्यात १३ अंडी उबवनी केंद्रात संरक्षित केलेल्या घरट्यातून दररोज सुमारे २०० ते ३५० पिल्ले सोडण्यात येत आहेत.स्थानिक आणि पर्यटक यांनी हे सुवर्ण क्षण अनुभवण्याचा  लाभ घ्यावा असे आवाहन वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी केले आहे.