विकास कसा असतो हे दाखवून देवू - विष्णू मोंडकर

विकास कसा असतो हे दाखवून देवू - विष्णू मोंडकर


मालवण 
       कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा मोठ्या मताधिक्याने झालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मतदार संघाच्या विकासाचा रथ सन २०१४ मध्ये अविश्वासाचे नाते निर्माण करत वैभव नाईक यांनी रोखला होता. मात्र यावेळच्या निवडूकीत मिळालेल्या विजयानंतर जनतेच्या माध्यमातून हा विकासाचा रथ २०२४ पासून पुन्हा एकदा ताकदीने भाजप आणि महायुतीच्या वतीने पुढे नेणार आहोत असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.