वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावर गाडी अपघात, चालक सुरक्षित

वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावर गाडी अपघात, चालक सुरक्षित

 

वेंगुर्ले

 

     बुधवारी रात्री आडेली येथील साईप्रसाद विजय नाईक (३२) यांचा अपघात झाला. नाईक याने आपल्या मारुती सुझुकी इर्टिगा  गाडीने वेंगुर्ले–सावंतवाडी मार्गावरील मठ हायस्कूलच्या गेटच्या भिंतीला धडक दिली, ज्यामुळे गाडी आणि शाळेच्या गेटचे नुकसान झाले. सुदैवाने, अपघातात चालक जखमी झाला नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीसांसोबत वाद झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवली आहे. वेंगुर्ले पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध दारूच्या नशेत वाहन चालवणे आणि पोलिसांना धमकी देणे या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करत आहेत.