दोडामार्ग पंचायत समितीवर सभापती पदी भाजपच्या पार्वती गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग पंचायत समितीवर सभापती पदी भाजपच्या पार्वती गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस

 

दोडामार्ग


   दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने आपले वर्चस्व राखले आहे. सभापती पदी भाजपच्या पार्वती महादेव गवस यांची, तर उपसभापती पदी शिंदे शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात जोरदार जल्लोष केला. पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या या पदांसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली होती. तहसीलदार राहुल गुरव यांचे मार्गदर्शनखली ही प्रक्रिया पार पाडली यावेळी सभापती पदा साठी भाजपच्या वतीने पार्वती महादेव गवस यांनी एकमेव अर्ज दाखल केला. उपसभापती पदा साठी शिंदे शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचा एकमेव अर्ज आला. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.यावेळी महायुतीचे दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, पं.स. सदस्या स्नेहा गवस, सायली निंबाळकर आणि रामदास मेस्त्री यांचा समावेश होता. तर भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, पराशर सावंत, संजय सातार्डेकर, सोनिया कुबल तसेच खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विजयाचा जल्लोष युतीच्या घोषणा. बिनविरोध निवडीची घोषणा होताच पंचायत समिती परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. तालुक्याच्या विकासासाठी भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र येऊन काम करतील, असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी सभापती व उप सभापती केबिन मध्ये खुर्चीवर बसविण्यात आले त्यांनतर शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.