आता मोबाईल सिम खरेदी करताना करावे लागणार नवीन नियमांचे पालन.

आता मोबाईल सिम खरेदी करताना करावे लागणार नवीन नियमांचे पालन.

नवी दिल्ली.

   मोबाईलमधील सिमकार्डसंबंधित नवीन नियमावली १ डिसेंबर २०२३ लागू होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच हे बदल होणार होते. मात्र, सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून मोबाईलधारकांना दिलासा दिला होता. त्यामुळे सिम खरेदी करताना तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. देशातील सायबर फ्रॉड कमी करण्यासाठी सरकारने हे नियम बनवल्याचं सांगण्यात येत आहे.बल्क सिमकार्ड म्हणजे मोठ्या प्रमाणात सीम कार्डची खरेदी करताना आणि नवीन सिम खरेदी करतानाही नव्या नियमांची अंमलबजावणी ग्राहकांना करावी लागणार आहे. नवीन सिम  खरेदी करताना ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक सखोल माहिती द्यावी लागणार आहे. खोट्या सिमचा वापर करुन होणाऱ्या गुन्हेगारीला यामुळे आळा बसेल.आता जे दुकानदार सिमकार्डाची घाऊक खरेदी करतात, अशा विक्रेत्यांची वैयक्तिक पोलिस पडताळणी होणार आहे. तसेच त्यांच्यामार्फत ज्या सिमकार्डची विक्री होते ती कुठे होते, कुणाला होते, सिमकार्ड खरेदी करणाऱ्या व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे संबंधित विक्रेत्याने नीट पडताळून त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवला आहे का, याचीदेखील तपासणी होणार आहे.नवीन नियमांचे पालन न केल्यास दुकानदारस १० लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.एक ग्राहक जास्तीत-जास्त ९ सीमकार्ड स्वतःच्या ओळखपत्रावर खरेदी करुन शकणार आहे. जर तुम्ही एखादे सिम कार्ड डिएक्टीव्हेट केले, तर ९० दिवसानंतरच ते सिम दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये अॅक्टीव्ह होईल.सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने देशभरामध्ये मोबाइल सिमकार्डाची विक्री करणाऱ्या तब्बल ६७ हजार विक्रेत्यांची यादीच सरकारच्या हाती लागली आहे. या प्रकरणांत देशभरात एकूण ३०० एफआयआर देखील पोलिसांनी नोंदवले आहेत तर, या विक्रेत्यांच्या मार्फत विक्री झालेली तब्बल ५२ लाख अवैध सिमकार्ड सरकारने बंद केली आहेत. त्यामुळे गुन्हेगारी ला आळा बसण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.