खुल्या ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेत नेहा ढोले व महिमा नार्वेकर प्रथम.

खुल्या ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेत नेहा ढोले व महिमा नार्वेकर प्रथम.

वेंगुर्ला.

   नाविन्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर- मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त 'महिलांसाठी' कोणत्याही सामाजिक ज्वलंत विषयावर ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.या स्पर्धेला दोन्ही गटातून महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
   सदर ऑनलाईन अभिनय स्पर्धा ही  शालेय गट (इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शालेय मुली) आणि खुला गट अशा दोन गटात महिलांसाठी आयोजित करण्यात आली होती.
   सामाजिक ज्वलंत विषयाला अनुसरून स्पर्धकांनी स्त्री-भ्रूण हत्या, निर्भया, लग्न समस्या, वानरांचा उच्छाद, सोशल मीडियाच्या अति वापरामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे, जिजाऊ संदेश, विठ्ठलाचे वर्तमान मनोगत, मुलींची वाढती असुरक्षितता, वारकरी, मोबाईलचा अति वापर, आरक्षण अशा अनेक विषयावर महिलांनी साभिनय एकपात्री सादरीकरण केले.या एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणेः

खुला गट, निकाल -

प्रथम क्रमांक: नेहा समीर ढोले (श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी)

 द्वितीय क्रमांक: पूर्वा रामदास चांदरकर (राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी)

तृतीय क्रमांक : रीना नीलेश मोरजकर (बांदा, सावंतवाडी).

उत्तेजनार्थ प्रथम : सोनाली सचिन गोडे (पिंगुळी, कुडाळ),
उत्तेजनार्थ द्वितीय : वीणा वामन गावडे (पेंडूर, वेंगुर्ला).

शालेय गट निकाल -

प्रथम क्रमांक: महिमा रुपेश नार्वेकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा)

द्वितीय क्रमांक: आर्य गोपाल चेंदवणकर (प्रा. एम. आर. देसाई इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला)

तृतीय क्रमांक :वीरा मनोज पारकर (श्री. एस. पवार पूर्व प्राथमिक शाळा, देवगड)

उत्तेजनार्थ प्रथम : श्रावणी राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल कुडाळ)
उत्तेजनासाठी द्वितीय: तनिष्का संदीप देसाई. (देगवे, बांदा)

    वेताळ प्रतिष्ठान आणि दाभोलकर मेस्त्री मंच च्या वतीने या अगोदर ग्रामपंचायत महिला सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य आदींसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, तर यावेळी महिलांसाठी खुल्या ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर यांनी विविध स्तरातील महिलांसाठी विविध स्पर्धा यापुढेही सुरू रहातील असे सर्व प्रतिपादन करीत सहभागी स्पर्धकांचे आभार व्यक्त केले. सर्व विजेत्या स्पर्धकाना रोख पारितोषिक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विविध सामाजिक विषयावर व्यक्त होण्यासाठी महिलांसाठी व्यासपीठ दिल्याबद्दल महिला स्पर्धकांनी प्रतिष्ठान चे ऋण व्यक्त केले.