सिंधुदुर्गातील निसर्ग रक्षणासाठी सायकल रॅली, कळणे येथे उत्स्फूर्त स्वागत

सिंधुदुर्गातील निसर्ग रक्षणासाठी सायकल रॅली, कळणे येथे उत्स्फूर्त स्वागत

देवगड

 

     देवगड येथून सुरू झालेल्या सायकल रॅलीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत होत आहे. ही रॅली दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे पोहचली असता, ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींच्या वतीने रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.कळणे गावच्या माजी सरपंच श्रीमती सुनिता भिसे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक, बँकेचे कर्मचारी, कळणे येथील स्थानिक ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सायकल पटूंचे कौतुक करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.देवगडवरून सुरू झालेली ही सायकल रॅली २६ मे रोजी संध्याकाळी दोडामार्ग येथे पोहोचणार असून तिथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या मुक्कामानंतर, उद्या म्हणजेच २७ मे रोजी दोडामार्ग बॉर्डरवरील ऐतिहासिक 'मुक्ती लढाई'च्या स्मारकावर सर्व सायकलपटू आणि नागरिक एकत्रितपणे सिंधुदुर्गच्या निसर्ग रक्षणाची सामूहिक शपथ घेणार आहेत.आपल्या सिंधुदुर्गातील संपन्न निसर्ग आणि येथील जैवविविधता टिकून राहणे ही काळाची गरज आहे. या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.