राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षणे २२ एप्रिलला होणार जाहीर

राजापूर
राजापूर तालुक्यातील 101 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षणे जाहीर होणार आहेत. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. सन 2025 ते 2030 या कालावधी करिता राजापूर तालुक्यातील 101 ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मुंबई गोवा हायवे जवळ आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील 101 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. तरी राजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, तसेच लोकप्रतिनिधी, सुजाण नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी या सोडतीच्या कार्यक्रमावेळी उपस्थित राहावे असे आवाहन राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.