गणित संबोध परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे विद्यार्थी चमकले

गणित संबोध परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे विद्यार्थी चमकले


सावंतवाडी 


     सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या गणित संबोध परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. इयत्ता आठवीत प्रवेशलेल्या २५ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी ७५ पेक्षा अधिक गुण मिळविले,तर १२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन गणितातील प्राविण्य सिद्ध केले. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन श्री. अरुण गावडे सर यांनी केले, आणि सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी जिल्हास्तरीय गणित प्राविण्य परीक्षेस पात्र ठरले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन करत प्राचार्य नितीन गावडे, अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ आणि सर्व संचालकांनी प्राविण्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.