स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची वेंगुर्ल्याला अनोखी भेट : प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई. स्वामी विवेकानंद यांच्या वेंगुर्ला भेटीच्या आठवणी जपणार.
वेंगुर्ला.
स्वामी विवेकानंद 1892 सालच्या दरम्यान वेंगुर्ला येथे आले होते. वेंगुर्ला नगर वाचनालयात त्यांनी "संचित प्रारब्ध व क्रियमान" या विषयावर हिंदीतून व्याख्यान दिले होते. स्वामी विवेकानंदांची ही वेंगुर्ला भेट वेंगुर्ल्याच्या इतिहासात महत्वाची आहे. स्वामी विवेकानंदांच्या वेंगुर्ला भेटीची आठवण वेंगुर्ल्यात असावी जेणेकरून पुढील पिढीला या ऐतिहासिक भेटीची माहिती होऊन प्रेरणा मिळेल या हेतून आनंदयात्री वांगमय मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना पत्र देऊन मागणी केली होती.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई , मा. नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप यांनी याचा पाठपुरावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करून आज युवा दिनादिवशी त्याला मंजुरी मिळाली आहे. तसे पत्र वेंगुर्ला नगरपरिषदेला प्राप्त झाले आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती 12 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभर युवा दिन म्हणून साजरा केला जातो. वेंगुर्ल्यातील स्वामी विवेकानंदांच्या भेटीच्या स्मृती स्वामी विवेकानंद शालेय कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून जपल्या जाणार आहेत.
या केंद्रात स्वामी विवेकानंद दालन, ई लायब्ररी , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिका असणार आहे. सहा महिन्यात हे केंद्र उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वामी विेवेकानंद यांना अभिप्रेत असणारी युवा पिढी निर्माण होण्याच्या दृष्टीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहेत.
वेंगुर्ला तालुका कार्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री सुहास गवंडळकर तालुकाध्यक्ष, प्रसन्ना देसाई जिल्हा उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, बाबली वायंगणकर तालुका सरचिटणीस, वृंदा गवंडळकर महिला मोर्चा सरचिटणीस, रविंद्र शिरसाट बूथ अध्यक्ष, प्रणव वायंगणकर युवा मोर्चा, सुनील मठकर सदस्य, भूषण सारंग युवा कार्यकर्ता, संतोष शेटकर शक्ती केंद्र प्रमुख, सोमनाथ टोमके जी.उपाध्यक्ष, सत्यविजय गावडे सरपंच अणसुर, मारुती दोडणशेट्टी युवा सदस्य, दादा केळुसकर मच्छिमार संघटना, प्रशांत आपटे शक्ति केंद्र प्रमुख, सुषमा प्रभूखानोलकर जिल्हा उपाध्यक्ष, संकेत धुरी उपसरपंच आसोली, मिलिंद चमणकर, कौस्तुभ वायंगणकर युवा मोर्चा सदस्य, साई प्रसाद नाईक जि.का.का सदस्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते.