वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने झुलता पुल व नवाबाग समुद्रकिनारी राबविण्यात आले महास्‍वच्‍छता अभियान.

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने झुलता पुल व नवाबाग समुद्रकिनारी राबविण्यात आले महास्‍वच्‍छता अभियान.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने झुलता पुल व नवाबाग समुद्रकिनारी राबविण्यात आले महास्‍वच्‍छता अभियान.

वेंगुर्ला.

  “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता) हे अभियान देशभरात दि.१४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्‍यात येत आहे. या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरुन दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७.००  वाजता जलबांदेश्‍वर येथील झुलता पुल व व नवाबाग समुद्र किनारा या परिसरात वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत महास्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात आले.  
    वेंगुर्ला जल बांदेश्वर येथील झुलता पुल व नवाबाग समुद्र किनारा येथे गणेश चतुर्थी निमित्त मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी भेट  दिली. त्‍यामुळे सदर परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढले होते.सक्षम पर्यटन विकासाच्‍या दृष्‍टीने सदरची बाब विचारात घेवून या परिसरातील प्‍लॅस्टीक पॅकेट्स, प्‍लॅस्‍टीक  बॉटल्स, काचेच्‍या बॉटल, खराब झालेली जाळी, थर्माकोल, चप्‍पल, फायबर, कापड अशा प्रकारचा विलगीकृत कचरा संकलन करून परिसराची साफ सफाई करण्‍यात आली. तसेच याठिकाणी उभादांडा ग्रामपंचायतीच्‍या Beach Cleaning  Machine चा  वापर करुन वाळूमधील कचरा गोळा करण्‍यात आला. या महास्वच्छता मोहिमेअंतर्गत अंदाजे २ टन एवढा कचरा वर्गीकृत करून संकलित करण्यात आला.
    या स्वच्छता मोहीमेसाठी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, स्‍वच्‍छतादूत डॉ.धनश्री पाटील, बॅ.खर्डेकर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी.चौगुले, न्‍यू इंग्लिश उभादांडाचे मुख्‍याध्‍यापक उमेश वाळवेकर इ. मान्‍यवर तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्‍यापक व विद्यार्थी व  ग्रीन नेचर क्लबचे विद्यार्थी, न्‍यू इंग्लिश उभादांडाचे शिक्षक व विद्यार्थी, वेंगुर्ला शहरातील श्री.गणेश महिला बचत गट, दुर्वा महिला बचत गट, गोल्डन महिला बचत गट, क्रांती महिला बचत गट, नवोदय महिला बचत गट, नारायण महिला बचत गट, फातिमा महिला बचत गट, वेलांकानी महिला बचत गट, सैसिद्धी महिला बचत गट, गुरुमाऊली महिला बचत गट, दयासागर महिला बचत गट, समर्थ महिला बचत गट, मनस्वी महिला बचत गट, एकादशी महिला बचत गट, समृध्दी महिला बचत गट, विसोटेश्वर महिला बचत गट, नवदुर्गा महिला बचत गट, अंकुर महिला बचत गट इ. बचत गटांच्या महिला सदस्‍य व स्वच्छता प्रेमी वेंगुर्लावासीय नागरिक उपस्थित होते.
    वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नियमितपणे नवाबाग समुद्र किनारी स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात येते.पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण व मच्छीमारांचा पोशींदा असलेला समुद्राचा किनारा स्वच्‍छ करणे व प्‍लॅस्‍टीकच्‍या भस्‍मासुरापासून सागरी जीवनाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे तसेच पर्यटकांनी पर्यटन स्‍थळी उघडयावर कचरा न टाकता नेहमी कचराकुंडीचा वापर करावा व पर्यावरणाचे संवर्धन करण्‍यासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी  केले.