जलजीवन मिशन कार्यक्रमाची आढावा बैठक सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथील सभागृहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी
जलजीवन मिशन अंतर्गत अपुर्ण कामे व प्रलंबित देयकांच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस उप अभियंता, उपविभागाचे क्षेत्रीय अभियंता, PMC टीम लीडर, PMCचे सर्व क्षेत्रीय अभियंता व TPI चे टीम लीडर, TPI चे क्षेत्रीय अभियंता व जिल्ह्यातील जल जीवन मिशन कामांचे मक्तेदार उपस्थित होते. या सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटदार यांच्या अडचणी समजून घेवून त्या दूर करण्याचे निर्देश सर्व कार्यालयीन यंत्रणांना दिले. जलजीवन मिशनची कामे पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी पुर्तता करणे आवश्यक आहे. त्या तातडीने कराव्यात, ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत. जलजीवन मिशन योजनेचा शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर शासन निर्देशानूसार पैसे वितरीत करण्यात येतील आपल्या जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळणे आवश्यक असल्याने सर्व यंत्रणानी कार्यवाही करावी. मक्तेदाराला त्यांच्या कामामध्ये सहकार्य करणे आवश्यक आहे. कामात अनावश्यक आडकाठी आणु नये तसे निर्दशनास आल्यास त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल. सकारात्मक भूमिकेतून ही योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी काम करणे आवश्यक असल्याचेही श्री. खेबुडकर म्हणाले.