कसाल येथे ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्यान व मार्गदर्शनाचे आयोजन.
कुडाळ.
'दीपस्तंभ मनोबल' हे देशातील पहिले दिव्यांग, अनाथ, आदिवासी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उच्च शिक्षण व विकसित व व्यक्तिमत्त्व विकसन केंद्रचे संस्थापक, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा करिअर क्रांतीचे प्रणेते यजुर्वेंद्र महाजन यांचे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांकरिता बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विद्यानिकेतन स्कूल, कसाल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्यान व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या 'दीपस्तंभ मनोबल' या संस्थेत 300 विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य निवासी प्रशिक्षण घेत आहेत.
राष्ट्रीय हेलन केलर अवॉर्ड, तरुण तेजांकित पुरस्कार, अपंग मित्र पुरस्कार, व्याख्यान वाचस्पती पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारसा जपणारा अवलिया अशी त्यांची ख्याती आहे.
यूपीएससी, एमपीएससी व प्रशासकीय परीक्षा संबंधी ते सिंधुदुर्गातील दहावी व पुढील वर्गातील मुलांसाठी जे या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत याना ते विद्यानिकेतन कसाल या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत.प्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही कार्यशाळा मोफत असून त्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घ्यावा असे आवाहन विद्यानिकेतन स्कूल कसाल व युरेका सायन्स क्लब, कणकवली यांच्यामार्फत करण्यात येत आहे.यजुर्वेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चौदा वर्षात 500 हून अधिक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी व 1400 विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत.स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयावर त्यांची आतापर्यंत 2000 हून अधिक व्याख्याने पूर्ण देशभरात झाली आहेत. तसेच आत्तापर्यंत त्यांनी दहा लाख विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन केले आहे. शिक्षक प्रबोधनातून दोन लाखाहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. अभ्यास मित्र, करिअर मित्र, पालक मित्र आणि स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.त्यांच्या 'दीपस्तंभ मनोबल' या संस्थेत 300 विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य निवासी प्रशिक्षण घेत आहेत.