राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या तायक्वांदोपट्टूंनी केली पदकांची लयलुट.
रत्नागिरी.
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 एप्रिल ते 1 मे 2024 या कालावधीत रॉयल ब्यकेट हॉल एमआयडीसी मिरजोळे येथे तायक्वांदो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेला राज्यभरातून 750 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये रत्नागिरीतील जय भैरी, एस.आर. के आणि गणराज क्लब मधील 100 खेळाडूंनी सहभाग घेऊन सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकाची लयलूट केली.
पदक विजेत्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे-
सुवर्ण पदक - वेदांत चव्हाण, सार्थक चव्हाण, श्रुती चव्हाण, मृण्मयी वांयगणकर, ओम झगडे, सुरभी पाटील, त्रिशा मयेकर, गौरी विलणकर
रौप्य पदक - ओम अपराज, सान्वी मयेकर, रवी वारंग, स्वरा साखळकर (वैयक्तिक ), शिवतेज पाटील, स्वानंद तुपे
कांस्य पदक - अमेय सावंत, मृदुला पाटील, रोहित कुंदकर, श्रेयसी हातिसकर, स्वरा साखळकर (फ्रीस्टाईल), स्मित किर, आध्या कवितके, विहान शेटये, त्रिशा मयेकर
सर्व विजेत्या खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना जय भैरी क्लबचे मिलिंद भागवत गणराज क्लबचे प्रशांत मनोज मकवाना, महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या मकवाना, व एस.आर.के क्लबचे शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, पालक वर्ग, खेळाडूच सर्व रत्नागिरी तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे. विजेते खेळाडूना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, गणराज, जय भैरी, एस.आर.के, तायक्वांदो क्लबचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला राष्ट्रीय पंच साहिल आबरेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.