टीम इंडिया ची श्रीलंकेवर ३०२ धावांनी मात. वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये आपलं स्थान सुनिश्चित करणारा भारत हा पहिला संघ.

टीम इंडिया ची श्रीलंकेवर ३०२ धावांनी मात.   वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये आपलं स्थान सुनिश्चित करणारा भारत हा पहिला संघ.

मुंबई.

   टीम इंडियाने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करून वर्ल्डकप २०२३ च्या सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ५० षटकात ८ बाद ३५८ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तर श्रीलंकेचा डाव फक्त ५५ धावात संपुष्ठात आला आणि भारताने ही लढत ३०२ धावांनी जिंकली. भारताकडून मोहम्मद शमीने ५ षटकात १८ धावा देत ५ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने ७ षटाकत १६ धावा देत ३ तर जसप्रीत बुमराहने ५ षटकात ८ धावा देत १ विकेट मिळवली. लंकेची अखेरची विकेट रवींद्र जडेजा ने घेतली. टॉस जिंकून श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने ९२, विराट कोहलीने ८८ तर श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. या तिनही फलंदाजांचे शतक हुकले असले तरी टीम इंडियाने ५० षटकात ३५७ धावांची मोठी धावसंख्या उभी केली होती.विजयासाठी मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने धक्का दिला.त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने आणखी दोन विकेट घेतल्या. ज्याने त्यांची अवस्था ३ बाद २ अशी झाली. चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सिराजने कुशल मेंडिसला बाद करत लंकेला चौथा धक्का दिला. पहिल्या ४ ओव्हरमध्ये लंकेचा पराभव निश्चित झाला होता. बुमराह आणि सिराज यांच्या भेदक माऱ्यानंतर १० व्या षटकात कर्णधार रोहित शर्माने चेंडू मोहम्मद शमीच्या हातात दिला त्याने एका पाठोपाठ एक श्रीलंकेच्या फलंदाजांना माघारी पाठवले आणि भारताला मोठा विजय मिळून दिला. वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये आपलं स्थान निश्चित करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताचा पुढचा सामाना दक्षिण आफ्रिका सोबत होणार आहे.