देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत ४९ प्रकरणे निकाली.
देवगड.
उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय 'क' स्तर-देवगड येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीमती एन.बी. घाटगे यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा ७९६ प्रकरणांपैकी एकूण ४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २७ लाख २ हजार २६ रुपये इतकी वसुली झाली.
तालुका विधी सेवा समिती-देवगड व तालुका बार असोसिएशन-देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.देवानंद गोरे, अँड.अविनाश माणगावकर, ॲड.प्रकाश बोडस, ॲड.इंद्रनील ठाकुर, ॲड.प्रसाद करंदीकर, ॲड.अमेय गुमास्ते, ॲड.सिद्धेश माणगावकर, ॲड.अन्वी कुलकर्णी, ॲड. मैथिली खोबरेकर, ॲड.विशाल देवगडकर, ॲड.आरती दामले, ॲड.संगीता कालेकर, ॲड.आशिष लोके, ॲड. आरती खाडीलकर, ॲड. मिलकेशा सांगळे तसेच अन्य विधीज्ञ व पंचायत समितीचे प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी नीलेश जगताप व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील एकूण २८२ दावे ठेवण्यात आले होते. त्यातील २८ खटले निकाली काढण्यात आले.त्यातून ५ लाख ९० हजार ९८७ रुपये इतकी वसुली झाली. तर बँक, दूरसंचार विभाग, ग्रामपंचायत विभाग, नगरपंचायत, महावितरण यातील ५१४ इतकी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील २१ प - करणे निकाली काढण्यात आली.यातून एकूण २१ लाख ११ हजार ३९ रुपये इतकी वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून ॲड.विना लिमये यांनी काम पाहिले.