तेरेखोल नदीमध्ये मगरीचे दर्शन

तेरेखोल
तेरेखोल नदीमध्ये महाकाय मगरींचे वास्तव्य असून आळवाडी येथील घाट पायऱ्यांवर मगरीचे दर्शन झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरेखोल नदीमध्ये हजारो मगरी असल्याची माहिती आहे. अशाच एका महाकाय मगरीला घाट पायऱ्यांवर पाहिल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेमुळे नदीकाठी वावरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या मगरींच्या वावरावर लक्ष ठेवून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.