बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे ३ सप्टेंबर रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन.
मालवण.
येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दीनिमित्त 'इस्त्रो'- भारताच्या अंतराळ संशोधनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत केले आहे.
या स्पर्धेत 'इस्त्रो'च्या अंतराळ संशोधनावर आधारित २५ प्रश्न विचारले जाणार आहेत. सेवांगण उपक्रम समूह, सेवांगण उपक्रम समूह २, सेवांगण उपक्रम समूह ३ व सेवांगण फेसबूक पेजवर प्रश्न पाठविले जाणार आहेत. या प्रश्नांची उत्तरे दीपक भोगटे- ९४२३८३३१६३ व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.