राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत प्रशांत अपराज यांची बैलजोडी प्रथम

राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत प्रशांत अपराज यांची बैलजोडी प्रथम

 

कणकवली

 

        कणकवली शहरातील श्री विश्वकर्मा मित्रमंडळ कणकवली सुतारवाडी च्या वतीने निम्मेवाडी च्या पटांगणात राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धा झाली. यात प्रशांत अपराज यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. ४९.२२ सेकंदात या गाडीने अंतर कापले विजेत्या बैलगाडीस २०,०२६ रूपये रोख व ढाल देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक रमेश पावसकर यांच्या बैलगाडीने (४९.४४ सेकंद) पटकावला. त्यांना १५,०२५ रूपये व ढाल प्रदान करण्यात आली. तृतीय क्रमांक अभिनव राणे यांच्या बैलगाडीने (५०.४४ सेकंद) पटकावला. त्यांना रू. १०,०२५ हजार रोख व ढाल देऊन गौरविण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बैलगाडी शर्यत स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत वैभवी हरमले लांजा चौथा क्रमांक रू. ७०२५, बिरोबा मानाई लांजा पाचवा क्रमांक रू. ५०२५, आई महालक्ष्मी उन्हाळे सहावा क्रमांक- रू. ३०२५, राजू बागवे कुंदे सातवा क्रमांक- २०२५, साईप्रसाद मोडक आठवा क्रमांक-रू. २०२५ तर उत्कृष्ट बैलजोडी चंद्रकांत पेडणेकर तसेच उत्कृष्ट जॅकी उत्तम चव्हाण व गावठी बैलजोडीत बबन पांचाळ, विराज पाटकर, राजेश कदम यांना पारितोषिक व ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.या बैलगाडी शर्यत स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
          यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, उद्योजक रामदास (रामू) विखाळे, माजी नगरसेवक विराज भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शहराध्यक्ष अण्णा कोदे, किशोर राणे, बाळू वालावलकर, अंबाजी राणे(गावपुरुष), माजी नगरसेविका कविता राणे, अशोक तावडे, प्रकाश परब, पिंटू परब, प्रशांत राणे, प्रशांत साटम, चारुदत्त साटम तसेच पशु वैद्यकीय अधिकारी, पोलीस हवालदार राजेंद्र नाणचे व होमगार्ड तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. उबाळे, डॉ. यादव आदी उपस्थित होते.