देवलीत पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा नवा उपक्रम

देवलीत पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा नवा उपक्रम

 

देवली

 

   देवली गावातील उत्साही तरुणांनी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत "देवली कयाकिंग" हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे गावात प्रथमच कयाकिंगसारखी जलक्रिडा सुविधा उपलब्ध झाली असून, स्थानिक युवकांसाठी नव्या संधींचे दरवाजे खुले झाले आहेत. "देवली कयाकिंग"च्या माध्यमातून गावातील तरुणांनी एकत्र येऊन स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत पर्यटन क्षेत्रात नव्या दिशा दाखवल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व आर्थिक स्वावलंबन वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. या नवउद्योजक तरुणांच्या धाडसी पावलामुळे देवली गाव पर्यटन नकाशावर उजळून निघेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.