पाट माऊली मंदिर येथे भव्य संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
कुडाळ
पाट माऊली मंदिर येथे हौशी मित्रमंडळ पाट यांच्यावतीने मंगळवार दि. २३ डिसेंबर व बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते ८.१५ या वेळेत भिवतादेवी प्रासादिक भजन मंडळ, नांदोस (बुवा – संजय मालंडकर), ८.३० ते ९.१५ दरम्यान मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नेरुर (बुवा – भार्गव गावडे), ९.३० ते १०.१५ या वेळेत साई खोडदेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पिंगळी (बुवा – गौरव धुरी) तसेच १०.३० ते ११.१५ या वेळेत सिद्धेश्वर भजन मंडळ, कोंडुरा (वेंगुर्ले) (बुवा – विवेक पेडणेकर) यांची स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते ८.१५ या वेळेत लक्ष्मीनारायण भजन मंडळ, वालावल (बुवा – सुरज लोहार), ८.३० ते ९.१५ दरम्यान सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसूर पाल (बुवा – हर्षद मेस्त्री), ९.३० ते १०.१५ या वेळेत श्री देव समाधी पुरुष भजन मंडळ, मळगाव (बुवा – गौरांग राऊळ) तसेच १०.३० ते ११.१५ या वेळेत कलेश्वर पूर्वी देवी प्रासादिक भजन मंडळ, वेत्ये (बुवा – प्रथमेश निगुडकर) यांची स्पर्धा होणार आहे.
या संगीत भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक – ₹५,००० व कायमस्वरूपी चषक, द्वितीय क्रमांक – ₹३,००० व कायमस्वरूपी चषक, तृतीय क्रमांक – ₹२,००० व कायमस्वरूपी चषक तसेच उत्तेजनार्थ बक्षीस – ₹१,००० ठेवण्यात आले आहे.
याशिवाय वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीसाठी उत्कृष्ट हार्मोनियम वादक (कायमस्वरूपी चषक – अशोक परब यांच्याकडून), उत्कृष्ट गायक व उत्कृष्ट तबला वादन (कायमस्वरूपी चषक – अथर्व होडावडेकर यांच्याकडून), उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट कोरस व उत्कृष्ट झांज (कायमस्वरूपी चषक – केशव पाटकर यांच्याकडून) अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या भव्य संगीत भजन स्पर्धेचा लाभ सर्व भजन रसिकांनी घ्यावा, असे आवाहन हौशी मित्रमंडळ पाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

konkansamwad 
