महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी: के. श्रीनिवास विजयी

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी: के. श्रीनिवास विजयी

 

मुंबई

 

      मुंबईत झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत तेलंगणाच्या के. श्रीनिवासने विजय मिळवला आहे. श्रीनिवासने अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अभिषेक चव्हाणला ९-२०, २३-०, २५-४ अशा फरकाने पराभूत केले.या स्पर्धेत दिव्यांग कॅरमपटू जगन्नाथ मैत्राणीच्या चिकाटीला सलाम म्हणून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने त्याचा १ लाख रुपयाचा धनादेश देऊन विशेष सन्मान केला. जगन्नाथ मैत्राणी हा एका हाताने कॅरम खेळत असून त्याच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.स्पर्धेत पहिल्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत के. श्रीनिवासने विजय मिळवला तर अभिषेक चव्हाणला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उत्तर प्रदेशच्या मोहम्मद आरिफने महाराष्ट्राच्या चांद युसूफ शेखला १७-८, १६-१२ अशा फरकाने पराभूत केले.स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. के. श्रीनिवासला १ लाख ५० हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली तर अभिषेक चव्हाणला १ लाख रुपये व ट्रॉफी देण्यात आली. मोहम्मद आरिफला ७५ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.