दोडामार्ग घोटगेवाडी येथील नूतन ग्रामपंचायत आणि जि. प. दवाखान्याचे शानदार उद्घाटन

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद दवाखान्याच्या नूतन इमारतींचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते या नूतन वास्तूंचे अनावरण करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण मणेरीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, प्रेमानंद देसाई, गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, संजय सातार्डेकर, दोडामार्ग सरपंच संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटकर, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रविण गवस, गोपाळ गवस, भगवान गवस, रामदास मेस्त्री, रत्नकांत कर्पे यांच्यासह घोटगेवाडीचे सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, ग्रामपंचायत अधिकारी सोनिया नाईक, जि.प. दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी निरंतर शर्मा, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल दळवी, नुतन पांगम, सुचिता नाईक, प्रीती भणगे, रूपाली करमळकर, पोलीस पाटील संतोष नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन केसरकर, शामराव देसाई, कोमल भागवत, सोनाली चोबे, घोटगेवाडीचे माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.