वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

 

सावंतवाडी
 

      सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. रस्त्यावरून जात असताना एका वेगवान वाहनाने दिलेल्या धडकेत सांबर ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी विजय पांचाळ, मोहन बोटुकडे, प्रविण कमळकर तसेच जलद कृती दल आणि पोलीस कर्मचारी आदींनी धाव घेतली. पंचनामा करून सांबराचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वन विभागाने या मृत सांबराचा पंचनामा केला आणि शासकीय नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाहनधारकाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या अपघातामुळे स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ व जंगल परिसरातून अनेक रस्ते जात असल्याने अशा अपघाताच्या घटना वारंवार घडतात. विशेषत: रात्रीच्या वेळी जंगलातून प्राणी रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांनी सावधगिरी बाळगावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.