गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. तब्बल ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक जण ताब्यात.

सावंतवाडी.
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मुंबई येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून २ लाख १६ हजाराच्या दारूसह ४ लाखाची गाडी असा एकूण ६ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संग्राम विक्रम सिंग (वय ३१, रा. मालाड मुंबई) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पत्रादेवी रोड आरोसबाग तिठयाजवळ राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काल जुना बांदा-पत्रादेवी रोडवर आरोसबाग तिठा येथे वाहनाची तपासणी करत असताना कारमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. या प्रकरणी संग्राम सिंग याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून ६ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास प्रभारी निरीक्षक प्रदीप रास्कर करत आहेत.