सिंधुरत्न समृध्द योजना सन २०२४-२५ याकालावधीत राबविण्यास मान्यता. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांची माहिती.

सिंधुरत्न समृध्द योजना सन २०२४-२५ याकालावधीत राबविण्यास मान्यता.  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांची माहिती.

सिंधुदुर्ग.

  जिल्ह्याचा सर्वंकष विकास करण्याच्य दृष्टीने सिंधुरत्न समृध्द ही पथदर्शी योजना सन 2022-23 ते 2024-25 या कालावधीत राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेमधुन पशुसंवर्धन विषयक पुढील योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यतेसह अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी दिली आहे.
   दुग्धोत्पादन व्यवसायासाठी पशुपालकांना अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे. मॉडेल क्र. 1-2/4 शुध्द देशी गाई (गीर/ साहीवाल) सुधारीत म्हैसींचा (पंढरपुरी/मु-हा/मेहसाना) गट पुरवठा करणे (वैयक्तिक लाभ).मॉडेल क्र.2-10 बचत गट सदस्यांना 20 गायी 20 म्हैसींचा गट पुरवठा करणे (सामुहीक तत्वावर )
   अंशत ठाणबध्द पध्दतीने स्थानिक /कोकण कन्याळ जातीच्या उन्नत शेळीपालनास प्रोत्साहन देणे. (10 शेळ्या 1 बोकड गट पुरवठा). अंड्यावरील 300 पक्षी संगोपनास अर्थसहाय करणे. या योजनेमधुन सर्वसाधारण प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थीस 75 टक्के तर अनु. जाती/ जमाती प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थ्यीस 90 टक्के अनुदानावर योजना लाभ देणे प्रस्तावित आहे.
   या तीन ही योजनांचे विहित नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव 31 जानेवारी 2024 पर्यंत पंचायत समितीस्तरावर स्विकारण्यात येणार आहेत. योजनेची माहिती व अर्जाचे नमुने जवळच्या पशुवैद्यकीय दवाख्यान्यात, पंचायत समितीस्तरावर उपलब्ध आहेत.