नारिंग्रे व मुणगे येथील आयोजित नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

नारिंग्रे व मुणगे येथील आयोजित नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

देवगड.

   कोर्टाची पायरी नको, त्याचप्रमाणे हॉस्पिटलची ही पायरी नको,ही वस्तुस्थिती आता सर्वांना माहित आहे. विविध शासकीय योजना असल्या तरी त्या शासकीय योजनेतून किती आरोग्याच्या तपासण्या होतात, किती जणांचा त्याचा लाभ यातून मिळतो हा संशोधनाचा विषय आहे. असे असताना ग्रामीण भागातील जनतेची गरज ओळखून ग्रामीण भागात आरोग्य शिबिर तपासणी उपलब्ध करून दिल्याबद्दल गणेश गावकर यांचे कौतुक केले. स्वर्गीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण २०% राजकारण या धोरणानुसार ८०% समाजकारण करण्याचे व्रत गणेश गावकर यांनी घेतलं आहे.केवळ तंबाखू आणि धूम्रपानामुळेच कॅन्सर होतो असं आता राहिलं नाही.दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या वस्तू पिकविण्यासाठी, जास्त काळ टिकविण्यासाठी  विविध केमिकल वापरले जाते त्या मधूनही कॅन्सरचे प्रमाण वाढतंय. त्यासाठी डेरवण रुग्णालयाच्या माध्यमातून कॅन्सर विषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उबाठा गटाचे शिवसेना नेते सतीश सावंत यांनी मुणगे येथे केले.
   उबाठा शिवसेना गटाचे युवासेना प्रमुख गणेश गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त बी के एल वालावलकर हॉस्पिटल डेरवण चिपळूण व नॅब नेत्र रुग्णालय देवगड मेडिकल फाउंडेशन डॉ आठवले यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भगवती एज्युकेशन सोसायटी स्व.वीणा सुरेश बांदेकर सभागृह येथे आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुरेश बांदेकर, डॉ अक्षय बेंद्ररे, डॉ अभिलाषा साबळे, डॉ तुषार मंडवाल,डॉ अक्षय नागरगोजे, डॉ सृष्टी शर्मा, डॉ रुचिर पवार, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विभाग प्रमुख श्रीकांत गावकर, मनोज भावे, दीपक पवार, लवु दळवी, शाखाप्रमुख बाळा सावंत, वैभव आडकर, हरीश आडकर, प्रमोद सावंत, प्रमोद वळंजू, तुषार आडकर रामचंद्र मालंडकर, आदी उपस्थित होते. युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त १७,१८,१९ मे २०२४ असे तीन दिवस सलग कार्यक्रम करण्यात आले.१७ तारीखला नारिंग्रे येथील लवु दळवी, यांच्या निवासस्थानी  नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास १०१ जणांनी नेत्रतपासणीचा लाभ घेतला. कणकवली तालुक्यातील १८ मे रोजी कणकवली तालुक्यातील दिविजा वृद्धाश्रमात वाढदिवसानिमित्त (धान्य) साहित्य वाटप केले.तर १९ मे तारीखला मुणगे कॉलेज येथे आयोजित केलेल्या या नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
   मुणगे पंचक्रोशीतील जवळपास ८० रुग्णांनी या शिबिरात नेत्र व आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरातील ज्या रुग्णांची तपासणी केली आहे त्यांची ऑपरेशन आहेत त्यांची ऑपरेशन डेरवण हॉस्पिटल येथे मोफत केली जाणार असून रुग्णांना नेऊन पुन्हा आणण्याची व्यवस्था देखील उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी सांगितले.