फोंडाघाट महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मुंबई विद्यापीठात मिळवले कांस्यपदक!

मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा (एस. बी. कॉलेज, शहापूर, ठाणे) मध्ये फोंडाघाट महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
७४ किलो वजन गट: आदित्य अनिल गिरीगोसावी (एफ.वाय.बी.ए.)
७९ किलो वजन गट: प्रदीपकुमार अनिल रासम (एफ.वाय.बी.कॉम.)
दोन्ही खेळाडूंनी महाविद्यालयाचे नाव गौरवाने उंचावले. त्यांच्या यशामागे प्रा. डॉ. बालाजी सुरवसे व प्रशिक्षक अविनाश रेपे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. प्राचार्य डॉ. अनिल सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे, संचालक मंडळ व महाविद्यालय विकास समिती यांनी खेळाडूंचे कौतुक केले.शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि फोंडाघाट ग्रामस्थांनी देखील या यशाचा आनंद व्यक्त केला.