सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत होडावडा केंद्र शाळा १ च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश.

वेंगुर्ला.
सन 2023-24 मध्ये झालेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परिक्षेत वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावातील केंद्र शाळा क्रमांक 1 च्या विदयार्थी कू. गार्गी मुरलीधर सातार्डेकर व कु. साईश समीर सावंत यांनी गोल्ड मेडल पटकावले. तर कु. विहंग सुशील पांचाळ हा ब्राँझ मेडलचा मानकरी ठरला. तसेच ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेत कु. गार्गी सातार्डेकर व कु. साईश सावंत ब्राँझ मेडलचे मानकरी ठरले. गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतही शाळेने उल्लेखनीय यश मिळवले असून कु. गार्गी सातार्डेकर व कु. साईश सावंत हे संयुक्तरीत्या राज्यात 3 रे आलेत. तर पाहिलीतील कु. सोहम संदीप सातार्डेकर हा राज्यात 11 वा आला.
या मुलांना वर्गशिक्षक तन्वी बांदिवडेकर, अर्चना मक्राणे व मुख्याध्यापक प्रशांती दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. शा.व्य.स.अध्यक्ष समीर सावंत.उपाध्यक्ष नंदिनी कामत सर्व सदस्य, सर्वपालक तसेच होडावडा केंद्रप्रमुख लवू चव्हाण यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले.