ओरोस येथे मतदार नोंदणी व जनजागृती अभियान संपन्न.

ओरोस येथे मतदार नोंदणी व जनजागृती अभियान संपन्न.

सिंधुदुर्ग.

    जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कुडाळ तसेच नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्गनगरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नर्सिंग परिचर्या महाविद्यलय ओरोस येथे मतदार नोंदणी व जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला,असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रमोद पिळणकर यांनी दिली.
   यावेळी तहसिलदार कुडाळ विरसिंग वसावे, नेहरु युवा केंद्र राष्ट्रीय युवा स्वयं सेवक विल्सन फर्नांडीस, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल मोहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व भारतीय नागरिकांना घटनेने बहाल करण्यात आलेला आहे. तो हक्क बजावता यावा म्हणून 18 वर्षावरील युवक युवती व नागरिकांनी मतदार म्हणून आपल नाव नोंदविणे करणे आवश्यक आहे. जनजागृती करण्याच्या दृष्टीने तहसीलदार कुडाळ विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेहरू युवा केंद्र राष्ट्रीय युवा स्वयं सेवक यांच्या सहकार्याने मतदार नोंदणी कार्यक्रमचा कार्यक्रम पार पडला.
   मतदार नोंदणी करणे ही काळाची गरज आहे, पण अठरा वर्ष वय झालेले तरुण-तरुणी मतदार नोंदणीकरणे आवश्यक असून मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवार निवडूण देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. मात्र मतदार होण्यासाठी मतदार म्हणून नोंदणी करणे, त्याचे आय कार्ड प्राप्त करणे,या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात म्हणून मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कुडाळ तहसीलदार यांच्या पुढाकाराने उचललेले पाऊल खरच स्तुत्य व कौतुकास्पद आहे, तसेच मतदानाचा हक्क बजावण्यायसाठी अशा उपक्रमांना सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मतदान नोंदणी अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
  यावेळी नायब तहसिलदार (निवडणूक) प्रमोद पिळणकर, परिवीक्षाधीन नायब तहसिलदार प्रतिक आढाव, निवडणूक कर्मचारी सचिन गवस, ई पी गंगावणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उल्का मेश्री, सचिन परब ओमकार मंचेकर तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक वर्ग व कर्मचारी, नर्सिंग परिचर्या महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी बहुसख्येने उपस्थित होते. यावेळी सुमारे 234 विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून आपली नोंदणी पूर्ण केली.