कणकवलीत उड्डाणपुलाखाली ऑटोमेटेड इ-टॉयलेटचे लोकार्पण.......पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवलीत उड्डाणपुलाखाली ऑटोमेटेड इ-टॉयलेटचे लोकार्पण.......पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

कणकवली

 

     कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून शहराच्या स्वच्छता व सार्वजनिक सुविधांमध्ये भर घालत उड्डाणपुलाखाली सेल्फ क्लिनिंग ऑटोमेटेड इ-टॉयलेट उभारण्यात आले आहे. या सुविधा केंद्राचे लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.या लोकार्पण सोहळ्याला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, प्रद्युम्न मुंज, माजी नगरसेविका मेघा गांगण, अमोल अघम, अमोल भोगले, प्रशांत राणे, सचिन नेरकर, वैभव करंदीकर, रवी महाडेश्वर, ध्वजा उचले, संदीप मुसळे, व्यापारी मंदार सापळे व अॅड. दीपक अंधारी यांचा समावेश होता.शहरातील वाढत्या लोकवस्तीनुसार स्वच्छतेची आणि सुलभ स्वच्छतागृहांची आवश्यकता लक्षात घेता उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक इ-टॉयलेट शहरवासीयांसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्वयंचलित पद्धतीने साफ होणाऱ्या या टॉयलेटमुळे स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.