जामसंडे येथे एसटीची धडक बसून मृत्यू झालेल्या तेजस बांदेकरच्या वारसाच्या खात्यात अपघात विम्याचे दहा लाख जमा.

जामसंडे येथे एसटीची धडक बसून मृत्यू झालेल्या तेजस  बांदेकरच्या वारसाच्या खात्यात अपघात विम्याचे दहा लाख जमा.

देवगड.

    देवगड आनंदवाडी येथील तेजस तुकाराम बांदेकर या युवकाचा जामसंडे दिर्बादेवी एस.टी.थांब्‍याच्‍या नजीक एस.टी.च्‍या धडकेत मृत्‍यू झाला होता.तेजस याचे देवगड स्‍टेट बॅंक शाखेत बचत खाते होते. व्‍यक्तिगत अपघात विम्‍यापोटी त्याच्‍या बचत खात्‍यातून वार्षिक हप्‍ता एक रकमी रूपये पाचशे बॅंकेकडून जमा करण्‍यात आले होते. तेजस बांदेकर या तरूणाचा अपघात मृत्‍यू झाल्‍याचे समजताच देवगड स्‍टेट बॅंक व्‍यवस्‍थापक गणेश शिंदे यांनी दखल घेवून संबधिताच्‍या वारसास अपघात विम्‍याचे दहा लाख लवकारात लवकर मिळवून देण्‍यासाठी आपले स्‍तरावरून प्रयत्‍न केले.
मयताच्‍या वारसाच्‍या खात्‍यात स्‍टेट बॅंक देवगड शाखेकडून अपघात विम्‍याचे दहा लाख रूपये जमा झाले. यामुळे मयत तेजस बांदेकरच्‍या पश्‍चात त्‍याची आई तेजस्विनी बांदेकर यांच्‍या खात्‍यात तातडीने अपघात विम्‍याचे दहा लाख रूपये जमा झाले याबाबतचे पत्र सामाजिक बांदलकीचे भान ठेवून स्‍वत: बॅंक व्‍यवस्‍थापक गणेश शिंदे यांनी आंनदवाडी येथे जावून तेजस्विनी बांदेकर यांच्‍या स्‍वाधिन केले.
   यावेळी त्‍यांच्‍या सोबत आशय मेस्‍त्री सर्व्‍हीस मॅनेजर, फिल्‍ड ऑफिसर संदेश घोरपडे,अनिल कदम,तेजस खराडे, मंगेश तावडे व विशाल जाधव आदी उपस्थित होते.