पाच वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.

पाच वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.

उत्तर प्रदेश. 

   फोनवर कार्टून पाहताना पाच वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हताईखेड येथे ही घटना घडली. कामिनी नावाची मुलगी तिच्या फोनवर कार्टून बघत होती. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मुलगी जागीच कोसळली. मुलीला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी चाचण्या केल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.