बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी एक ताब्यात

बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी एक ताब्यात

 

कुडाळ
 

   बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कने कोलगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दारूसह स्विफ्ट कार असा एकूण ९ लाख ६२ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजकुमार बाबुराव चव्हाण (वय ४६, रा. कोलगाव) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाकडून करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, एस. थोरात यांनी आपल्या पथकासह कोलगाव येथील मारुती मंदिर समोरील घर क्रमांक २९३ जवळ छापा टाकला. या छाप्यात एका करड्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये गोवा बनावटी दारूचे एकूण ६५ बॉक्स लपवून ठेवलेल्या स्थितीत आढळून आले.या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  ही कारवाई अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम. एस. गरुड आणि दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांना श्रीम. ए. ए. वंजारी, एस. एस. चौधरी, एस. एम. कदम, एन. पी. राणे, व्ही. एम. कोळेकर, पी. ए. खटाटे, प्रशांत परब, अवधूत सावंत आणि विजय राऊळ यांचे सहकार्य लाभले.या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात करत आहेत.