ध्वजदिन संकलन सैनिकांप्रती ऋण फेडण्याची मिळालेली संधी : जिल्हाधिकारी किशोर तावडे. सशस्त्र सेना ध्वजदिन कार्यक्रम संपन्न.

ध्वजदिन संकलन सैनिकांप्रती ऋण फेडण्याची मिळालेली संधी : जिल्हाधिकारी किशोर तावडे.  सशस्त्र सेना ध्वजदिन कार्यक्रम संपन्न.

सिंधुदुर्ग. 

   सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त निधी संकलन करुन देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी निधी संकलन करुन ऋण फेडण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले.
    सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर आदी उपस्थित होते.
    जिल्हधिकारी म्हणाले, देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सर्वांनी मिळून कार्य करणे आवश्यक आहे. ध्वज निधीच्या मध्यामतून विविध प्रकारे मदत केल्या जात आहे.  जिल्ह्याला सन 2022 मध्ये ध्वज निधी संकलनाचे  36 लाख 99 हजार एवढे उदिष्ट होते. त्याही पुढे जावून जिल्ह्यातील कार्यालयांनी 42 लाख 85 हजार  एवढे उदिष्ट पूर्ण केले. दिलेल्या उदिष्टापैकी  115 टक्के उदिष्ट साध्य करण्यात आले ही बाब निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे.  पुढील वर्षी म्हणजे सन 2023 मध्ये देखील  उदिष्टापेक्षा जास्त ध्वज निधी संकलन करुया, असेही ते म्हणाले.
    प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले. आभार प्रदर्शन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर तर सुत्रसंचालन श्रीधर गावडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली. यावेळी विरमाता, विरपत्नी, तसेच शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.