सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सिंधुदुर्ग वासियांचे लक्ष.

सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा.   उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सिंधुदुर्ग वासियांचे लक्ष.

कणकवली.

    रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी 6 वा. कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला ठाकरे शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या सभेत माजी आमदार परशुराम उपरकर हे स्वगृही परतणार असल्याचे समजते तसेच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उपरकर आपल्या हाती शिवबंधन बांधले जाणार आहे असे म्हटले जाते.उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येणाऱ्या जनसमुदायासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.कणकवली,देवगड, वैभववाडी,कुडाळ,मालवण तालुक्यातील मंडळीची सभास्थळी येण्याची व्यवस्था ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी आमदार वैभव नाईक व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सभा स्थळाची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला गेला होता.