मुंबई- गोवा महामार्गावर सीएनजी गॅस पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस सहज उपलब्ध व्हावा; कोकणवासियांची मागणी.

मुंबई- गोवा महामार्गावर सीएनजी गॅस पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस सहज उपलब्ध व्हावा; कोकणवासियांची मागणी.

मुंबई.

   कोकणातील गणेशोत्सवास जाण्याऱ्या दरवर्षीप्रमाणे गणेश भक्तांसाठी तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे प्रशासनाकडूनही जादा विशेष  रेल्वे गाड्या सोडणार आहेत. मुंबई गोवा महामार्ग सुद्धा गणेश भक्तांचा प्रवासास अधिक सुलभव्हावा म्हणून‌ संबंधित व्यवस्थापन प्रयत्नशील आहे.त्याचबरोबर कोकणात गणेशोत्सवास जाण्यासाठी खासगी वाहनधारक आपापल्या गाड्या घेऊन जाण्यासाठी नियोजन करत आहेत.
   यात सीएनजी गाड्या असणारे बहुतेक वाहनचालक प्रवास करणार हे ओघाने आलेच. कारण प्रवासात शक्य तेवढी आर्थिक बचत व्हावी या दृष्टीने वाहन चालक सीएनजी गॅसवर वाहन चालवण्यास पसंत करतात. परंतु प्रवासात त्यांना सीएनजी गॅस चा  पुरवठा योग्य तऱ्हेने आणि पुरेसा होत नसेल तर खूपच त्रास सहन करावा लागतो. सीएनजी गॅस पंपावरती गॅस भरती वेळी प्रवाशांना गाडीतून उतरावे लागते. कारण सीएनजी गॅस हा अति ज्वलनशील  आहे. जर लीक झाला तर त्याचा धोका अधिक असतो व सीएनजी गॅस ला एक दुर्गंधी पण असते. सीएनजी गॅस भरतेवेळी रांग लागल्यामुळे व तिथे गर्दी झाल्यामुळे धोका अधिक होतो.
    संभाव्य धोका टाळण्यासाठी पेट्रोल पंप ठिकाणी विशेष काळजी घ्यावयास हवी त्याचबरोबर तिथे मूलभूत सुविधा सुद्धा पुरवल्या पाहिजेत. कारण प्रवासामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, लहान मुलं सुद्धा असतात. सीएनजी गॅस चे फायदे सांगितले जातात. परंतु गॅसचा पुरवठा अनियमित असेल तर सीएनजी गॅस वाहनचालकांना खूप त्रास होतो. त्यासाठी ॲपद्वारे कोणत्या सीएनजी पंपावरती गॅस उपलब्ध आहे आणि कोणत्या सीएनजी पंपावरचा गॅस संपला आहे हे जर योग्य वेळी जाहीर केले तर  सीएनजी गॅस ग्राहकांना मदत होईल तसेच प्रवासही अधिक सुखकर होईल. मुंबई गोवा महामार्गावरील गणेशोत्सवासाठी साठी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना सीएनजी गॅस मुळे कोणताही त्रास न होता प्रवाशांच्या वेळेचा अपव्ययही होणार नाही. सीएनजी गॅस पुरवठा कंपनी तसेच प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी यासाठी लक्ष दिले तर सीएनजी ग्राहकांचे हाल होणार नाहीत.